Onion Export Ban Saam tv
महाराष्ट्र

Onion Export Ban: कांदा निर्यात बंदीमुळे २०० कंटेनर कांदा पडून; व्यापारी- शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Navi Mumbai News: विदेशातील मलेशिया, थायलंड, श्रीलंका, दुबई सारख्या देशांत भारतीय कांद्याला चांगली मागणी असल्याने हजारो टन कांदा निर्यात होत असतो

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे
नवी मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकरी आणि निर्यातदार व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक (Bajar Samiti) बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद करण्यात आल्याने कांद्याची आवक कमी झाली आहे. यामुळे कांदा पडून आहे. बंदी असल्याने निर्यातीसाठी निघालेला (Onion) कांद्याचे कंटेनर पडून आहेत. (Tajya Batmya)

विदेशातील मलेशिया, थायलंड, श्रीलंका, दुबई सारख्या देशांत भारतीय कांद्याला चांगली मागणी असल्याने हजारो टन कांदा निर्यात होत असतो. मात्र केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने निर्यातीसाठी निघालेला १५० ते २०० कंटेनर कांदा अडकून पडला आहे. तीन दिवसांपासून कंटेनरमध्ये कांदा अडकून पडल्याने तो सडू लागला आहे. हा सडलेला कांदा फेकावा लागणार असल्याने यात शेतकरी व व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३५ ते ४० रूपये किलोने शेतकऱ्यांकडून विकत घेतलेला कांदा निर्यात न झाल्याने स्थानिक बाजारपेठेत २० ते २५ रूपये किलोने विकण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. पुढील महिन्यात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कांद्याच्या नविन पिकाचे चांगले उत्पन्न होणार असल्याने सरकारने निर्यात बंदी उठवावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT