Nationalist Party  RNO
महाराष्ट्र

Maharashatra Politics: राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर; मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांचा गोंधळ

Anil patil In Dhule : मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यक्रमाची माहिती आपल्याला देण्यात आली नसल्याची नाराजी व्यक्त धुळ्यातील राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांनी भर कार्यक्रमात गोंधळ घातला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nationalist Party worker fight Anil Patil In Dhule :

धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकी दरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे बघण्यास मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत आज धुळ्यात झालेल्या कार्यक्रमातच हा अंतर्गत गटबाजीचा वाद उफाळून आला.

धुळे येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडत होती, या बैठकीला मंत्री अनिल पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पाटील यांच्यासमोर कैफियत मांडत नाराजी व्यक्त केली. कुठल्याही कार्यक्रमासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या धुळे शहर अध्यक्षांना कुठलीही कल्पना दिली जात नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी मंत्री महोदयांसमोर व्यक्त केली.

धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सातत्याने होत असलेल्या कार्यक्रमासंदर्भात धुळे शहर अध्यक्षांनाच विश्वासात घेतले जात नसल्यामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच भर कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यामुळे धुळ्यात पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे बघावयास मिळाले. त्यामुळे आता एन लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामधील हा गोंधळ वरिष्ठांची डोकेदुखी ठरतो की काय अशी चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फॅटी लिव्हरला बरं करायचंय? मग लाईफस्टाईलमध्ये करा 'हे' बदल

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

Weigh Gain Tips: वजन वाढवण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत? वाचा माहिती

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

SCROLL FOR NEXT