Nationalist congress women's committee saam tv
महाराष्ट्र

पत्नीला लुगडं घेण्याची ऐपत नाही, शहाजीबापू पाटील यांना राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे साडीची भेट

आमदार शहाजीबापू पाटील यांची पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

साम टिव्ही ब्युरो

सोलापूर : एकनाथ शिंदे गटातील (Eknath shinde) बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) गुवाहाटीतील झाडी, डोंगर आणि हॉटेलमुळं प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्या या डायलॉगबाजीवर मिश्लिक टीप्पणी करण्यात आली. एव्हढेच नव्हे तर काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल यावर गाणीही आली. परंतु, आता पुन्हा एकदा आमदार पाटील यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे (NCP) आमदार शहाजी बापू पाटील यांना एक भेट पाठवण्यात आलीय. पाटील यांच्या पत्नीला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी (Saree Gift) रेशमी इरकल साडी पाठवली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते (Ajit Pawar) अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साडीची भेट देण्यात आली आहे.

पत्नीला लुगडं घेण्याची ऐपत नसल्याचे शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असल्याची चर्चा होती. त्यामुळे पाटील यांच्या पत्नीला शोभेल अशी आठ हजाराची इरकल साडी राष्ट्रवादीतर्फे पाठवण्यात आलीय. सोलापूर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ही अनोखी भेट पाटील यांना पाठवण्यात आली आहे.

एका आमदाराला दीड ते पावणे दोन लाख रुपये मानधन असतानाही पाटलीन बाईला साडी घेता आली नाही, म्हणून आम्ही साडी भेट पाठवतोय , अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकारी विद्या लोलगे आणि सुनिता रोटे यांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT