sunetra pawar ncp  Saam tv
महाराष्ट्र

कुणाला नकोय राष्ट्रवादीचं विलिनीकरण? अजितदादांच्या मृत्यूनंतर विलिनीकरणाच्या चर्चेला जोर

Ajit Pawar News : दादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन राजकारण तापलंय.. मात्र कुणाला नकोय राष्ट्रवादीचं विलिनीकरण? कोण घालतंय विलिनीकरणात खोडा... पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..

Bharat Mohalkar

अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरलाय.. दोन्ही पक्षाचं विलिनीकरण ही अजित दादांचीच इच्छा होती.., असं म्हणत शरद पवारांनी थेट विलिनीकरणावर भाष्य केलं.. आणि त्यावरुनच आता राजकारण तापलंय..

एवढंच नाही तर ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विलिनीकरणासाठी अनेक बैठका झाल्याचं म्हटलंय. तर रोहित पवारांनीही दादांच्या तेराव्यानंतर गौप्यस्फोट करणार असल्याचं वक्तव्य केलंय..

विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतलीय. अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीचं विलिनीकरणाआधी भाजपशी चर्चा करावी लागेल, असे सूचक संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत... दुसरीकडे विलिनीकरणाच्या चर्चेची माहिती दादांनी फक्त फडणवीस यांनाच नाही तर तटकरेंनाही दिल्याचा गौप्यस्फोट शशिकांत शिंदे यांनी केलाय.

आता हे सगळं प्रकरण तापलं असतानाच दादांच्या राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह असल्याचं समोर आलंय.. आमदार सुनील शेळकेंनी थेट भाजपची री ओढलीय.. तर माणिकराव कोकाटेंनी मात्र सुनेत्रा पवार घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं वक्तव्य केलंय..

खरंतर विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगली होती.. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र आले.. एवढंच नाही तर चक्कं पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना तुतारी नाही तर घड्याळावर निवडणूक लढवण्यास मान्यता दिली.. त्यातून एकत्रिकरणाच्या चर्चेला पुष्टी मिळतेय.. मात्र दादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामुळे पक्षाचं नेतृत्व पवारांच्या हाती गेल्यास आपलं राजकीय करियर डावावर लागण्याच्या भीतीतून विलिनीकरणाला विरोध केला जातोय का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

Onion: व्यापाऱ्यांचा कांदा खरेदीस नकार, कांदा उत्पादकांचं टेन्शन वाढलं

Diesel Crisis: 7/12 शिवाय डिझेल नाही, सरकारची जाचक अट; शेतकऱ्यांचा संताप

Imran Khan: इम्रान खानची पत्नी रिलेशनशिपमध्ये, जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत बांधणार लग्नगाठ

Fact Check : आता सर्वांना मिळणार 7500 रुपये पेंशन? सरकारकडून निवृत्तीवेतनात भरमसाठ वाढ?

SCROLL FOR NEXT