Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : भाविकांवर मोकाट जनावरांचा हल्ला; दोन भाविक गंभीर जखमी

Nashik News : नाशिकच्या येवल्यात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : रस्त्यावर असलेल्या मोकाट जनावरांचा त्रास वाढतच चालला आहे. बऱ्याचदा मोटारसायकल किंवा पायी चालणाऱ्यांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच घटना येवल्यात घडली आहे. कोटमगाव देवीच्या यात्रेतून परतत असताना मोकाट जनावरांचा दोन भाविकांवर हल्ला केला. या हल्ल्यात भाविक गंभीर जखमी झाले आहेत. 

नाशिकच्या (Nashik News) येवल्यात मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर देखील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात आला नाही. दरम्यान सदरची घटना ताजी असतानाच काल रात्रीच्या सुमारास येवल्यातील कोटमगाव येथील नवरात्र उत्सवातून घरी परतत असताना सोनल विजय दाणेज व साई विजय दाणेज या दोघांवर मोकाट जनावरांनी हल्ला केला. 

दोघे गंभीर जखमी 

मोकाट जनावरांनी केलेल्या हल्ल्यात हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या वर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रस्त्यावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू राहिली आहे. यामुळे दोन घटनांनंतर प्रशासन आता काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ६८ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्याच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या

Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने केलं सई ताम्हणकरचं कौतुक

Shocking : रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेला, सासऱ्यांनी नकार दिला; रागात जावयाने सासरवाडी पेटवली

सिंधुदुर्गातील समुद्रात मोठी दुर्घटना; वादळाच्या तडाख्यात नौका बुडाली

Young adults lifestyle: शिक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या तरूणांना या आजाराचा धोका; संशोधनातून धक्कादायक बाब समोर

SCROLL FOR NEXT