आतापर्यंत तुम्ही लोकसभा, विधानसभापासनं ती पार ग्रामपंचायतीच्या निवडणुका बघितल्या असत्याल. पण एक अशी निवडणूक झालीय त्यात थेट गिधाडानं बाजी मारलीय. ती बी थोड्या थोडक्या नाय तर 958 मतांनी गिधाडानं गुलाल उधळलाय. अन् पराभूत केलंय कुणाला तर थेट कावळ्याला...
त्याचं झालं असं नाशिकच्या एका सामाजिक संस्थेनं शहराचा मानपक्षी कोण ठरवायचा यासाठी इलेक्शन घियाचं ठरवलं. अन् मैदानात उतरलं दोन उमेदवार एक म्हणजी गिधाड काका अन् दुसरा कावळोबा शेट. या दोन दिग्गजांसाठी 3,032 मतदारांनी मतदान केलं. तसं पाहिलं तर नाशकांत सुरुवातीला कावळ्याची जास्तच क्रेझ हुती. पण अखेरच्या क्षणात गिधाडानं डाव पलटत जोरदार मुसंडी मारत 1995 मतं मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवलं. अन् हरकेल्या कावळ्याचं तोंड पार हिरमसुलं . कावळोबाला मिळाली 1035 मतं अन् गिधाडानं 958 मतांनी विजयाचं काडकं पाडलं...
कसंय राजकारण म्हटलं की युत्या आघाड्या आल्या... पैशांचा पाऊस अन् भावनेचा खेळ आला.. पण या निवडणुकीत नो नोट ओन्ली वोट हीच गणित होतं... अत्यंत पारदर्शक लोकशाही पद्धतीने निकाल लागला. किमान या पक्षांकडून तरी फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनी काय तरी शिकावं येवढंच