Nashik TCS HR Nida Khan Update Saam Tv
महाराष्ट्र

Nashik : नाशिक टीसीएस प्रकरणातील धक्कादायक ट्वीस्ट, आरोपीचं दिल्ली ब्लास्टमधील आरोपीसोबत कनेक्शन?

Nashik TCS HR Nida Khan Update : नाशिकमधील TCS प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. आरोपी HR निदा खान हिचा दिल्ली ब्लास्टमधील आरोपीशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Alisha Khedekar

  • नाशिक TCS प्रकरणात ९ गुन्हे दाखल, ६ आरोपी अटकेत

  • HR निदा खान फरार असून भिवंडीत लपल्याची शक्यता

  • दिल्ली ब्लास्ट आरोपीशी कनेक्शन असल्याचा संशय

  • तपास ATS कडे, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर चौकशी सुरू

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिकमधील आयटी कंपनी टीसीएसमधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण केल्याप्रकरणात दररोज नवनवीन अपडेट समोर येत असताना, आता टीसीएस प्रकरणात आरोपी असलेल्या HR चं दिल्ली स्फोटातील आरोपीसोबत कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याप्रकरणातील HR निदा खान ही दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात असून यामुळे आता या प्रकरणातील तपासाची दिशा पूर्णपणे बदलली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक मधील नामंकित आणि बहुराष्ट्रीय कंपनी असलेल्या TCS मध्ये महिलांचं लैंगिक शोषण, तसेच धर्मांतर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस झाल्यानंतर ९ गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात कंपनीच्या महिला HR मॅनेजर निदा खानचा समावेश असल्याचं देखील उघड झालं. मॅनेजर निदा खान ही फरार असून ती भिवंडीत लपली असल्याचं समोर आलं आहे.

धक्कादायक म्हणजे संशयित आरोपी निदा खानचं दिल्लीमध्ये झालेल्या भीषण ब्लास्टमधील आरोपी डॉक्टर शहीनशी कनेक्शन असल्याचं म्हटलं जात आहे. या कनेक्शनमुळे तपासाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जोडून पाहण्यात येत आहे. याप्रकरणात आता पर्यंत ८ पैकी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील तपास आता ATS पथकाकडे सोपवण्यात आला आहे. नाशिक शहर पोलीसांकडून याबाबतची माहिती तक्रारदारांकडून घेतली जाणार आहे. स्वत: एटीएस आरोपींची चौकशी करणार आहे.

काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील काही फोटो समोर आले होते. या फोटोमध्ये संबंधित आरोपी कर्मचाऱ्याला धर्मांतर करण्यास भाग पाडत असल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी आता तपास यंत्रणांकडून सर्व बाजूंनी सखोल चौकशी सुरू आहे. काही संशयास्पद आढळल्यास माहिती तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात कळवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. पुढील काही दिवसांत याप्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. घडलेल्या घटनेने नाशिककर संतप्त झाले असून आज सकल हिंदू समाजाने TCS कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये TCS कंपनीत झालेल्या प्रकारावर निषेध व्यक्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT