AIMIM leader Imtiaz Jaleel gets bail in the Nashik TCS case as the district court grants relief on a Rs 50,000 bond. Imtiaz Jaleel
महाराष्ट्र

मोठी बातमी! TCS प्रकरणात इम्तियाज जलील यांना मोठा दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर

Imtiaz Jaleel gets bail in Nashik TCS case : नाशिक TCS धर्मांतर आणि महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण प्रकरणात एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

Namdeo Kumbhar

अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

Imtiaz Jaleel Gets Bail in Nashik TCS Case: नाशिकमधील टीसीएस (TCS) मधील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण प्रकरणात एमआयएम (MIM) नेते इम्तियाज जलील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांना ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

टीसीएस प्रकरणातील प्रमुख आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्यावर आहे. याच कारणावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते.

आज नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने जलील यांच्या जामिनाला तीव्र विरोध दर्शवला. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर इम्तियाज जलील यांचा जामीन अर्ज मंजूर केला.

मुख्य संशयित आरोपी निदा एजाज खान हिला पसार काळात छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhajinagar) विविध हॉटेल्स, खोल्या आणि स्वतंत्र घरांमध्ये लपवून ठेवण्यात आल्याचा उलगडा विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) (SIT) तपासात झाला होता. निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातून नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पडद्यामागे वेगाने हालचाली घडल्याचे तपासात निष्पन्न झाले होता. यावेळी एमआयएमचे नगरसेवक संशयित मतीन पटेल आणि माजी खासदार संशयित इम्तियाज जलील यांच्यात झालेला संवाद पोलिसांच्या हाती लागला होता. जलील यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. या प्रकऱणात त्यांना आज कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Fine on India: विजयानंतर टीम इंडियाला ICC चा मोठा झटका; खेळाडूंच्या मानधनातून कापली जाणार इतकी मोठी रक्कम, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याने धुळ्यात संताप

Political News: माफी मागून विषय संपत नाही, गुन्हा दाखल करा; संजय राऊत यांची मागणी

Bigg Boss 20: कॅप्टन होताच उदिती सिंहला मिळाली मोठी पॉवर; एका स्पर्धकाला मिळणार नॉमिनेशनपासून सुटका

चष्मा रोज व्यवस्थित ठेवला, स्वच्छ केला तरी त्यावर स्क्रॅच कसे पडतात?

SCROLL FOR NEXT