nashik, sindhi samaj, jitendra awhad saam tv
महाराष्ट्र

Nashik News : जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करा; नाशकात सिंधी समाजाचा माेर्चा

सिंधी समाज बांधवांची त्यांची दुकाने आज बंद ठेवली आहेत.

अभिजीत सोनावणे

Nashik News : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad यांच्या विरोधात नाशिक मधील सिंधी समाजाने (nashik sindhi samaj) आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकच्या शालीमार चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला जात आहे. (Maharashtra News)

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी उल्हासनगर शहरातील आयोजित एका कार्यक्रमात सिंधी समाजाबद्दल (sindhi community) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जात आहे. या वक्तव्यामुळे सिंधी समाजाचा अपमान झाल्याची भावना समाजाने व्यक्त करीत आव्हाड यांचा राज्यभरातून निषेध नाेंदविला जात आहे. काेल्हापूर येथे सिंधी समाजाने काही दिवसांपुर्वी आव्हाडांच्या व्यक्तव्याचा निषेध नाेंदवत माेर्चा काढला हाेता.

आज (साेमवार) नाशिक येथील शालीमार चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

राज्यभर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध नोंदविला जात असून नाशिकमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. झुलेलाल बेडा पार अशा आशय असलेल्या टोप्या घालून दंडाला काळ्या फिती लावत दुकानं बंद ठेवत हा निषेध नोंदवला गेला. ज्या सिंधी समाजाच्या बांधवांची दुकाने आहेत त्यांनी आज बंद ठेवली आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

SCROLL FOR NEXT