बापरे ! नाशिक पुन्हा हादरले, चाकूचे 25 वार करून महिलेचा घेतला जीव Saam Tv
महाराष्ट्र

बापरे ! नाशिक पुन्हा हादरले, चाकूचे 25 वार करून महिलेचा घेतला जीव

नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून खुनाच्या घटनांनी चांगलेच हादरले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : स्वच्छ, सुंदर आणि शांत शहर म्हणून ओळख असणारे नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून खुनाच्या घटनांनी चांगलेच हादरले आहे. आता एका महिलेचा चाकूचे एक नाही दोन नाहीतर तब्ब्ल २५ वार करून जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूजा आंबेकर असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

नाशिक मधील आंनदवल्ली खून प्रकरणाचा नुकताच उलगडा झाला आहे. याप्रकरणी तब्बल २० जणांना तुरुंगाची हवा खावी लागत आहे. त्यामध्ये बिल्डरांपासून ते २ कुख्यात गुंडांचाही समावेश आहे. यानंतर झालेल्या परप्रांतीय कामगाराचा झालेला खून. याप्रकरणी देखील पोलिसांनी २ बेड्या ठोकले आहेत. आता त्याच नाशिक मध्ये कबीर नगरमध्ये आणखी एका महिलेचा अतिशय निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे.

पूजा आंबेकर असे मृत महिलेचे नाव आहे. पूजावर तिच्यासोबत राहणाऱ्या इसमाने एक- दोन नव्हे, तर चक्क जवळपास २५ चाकूचे वार करण्यात आले आहेत. रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचा अंदाज आहे. संशयित संतोष आंबेकर फरार असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे आंबेकरवर या अगोदर देखील २ खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. तो अट्टल गुन्हेगार असल्याचे समजत आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT