CM Eknath shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Road Accident: नाशिक अपघातात १० मृत्यू; CM शिंदेंकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

Eknath Shinde Help families of the deceased: अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nashik Accident News Update : सिन्नर -शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दुःख व्यक्त केलंय.

या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. ट्विट करून त्यांनी याबाबद माहिती दिली.

या अपघाताचं वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक (Nashik) विभागीय आयुक्त, तसंच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात (Accident) आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून 35 ते 40 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तसंच हा अपघात नेमका कशामुळं झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

एकनाथ शिंदे यांचे ट्विट

नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बसचा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आले असून जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत. तसेच या अपघाताच्या चौकशीचे निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

अंबरनाथ, ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डी कडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघाल्या होत्या. त्यातील एका बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 ते 40 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

Horoscope: करिअरमध्ये प्रगती साधाल; यश, उन्नतीचे नवीन मार्ग मिळतील

Top 7 Mileage Bikes 2026: भारतात या टू व्हिलर देतात सर्वाधिक मायलेज; लिस्टमध्ये अनेक बाईक्सचा समावेश

SCROLL FOR NEXT