nashik shahapur  Saam Tv
महाराष्ट्र

Nashik : आजीने नदीत उडी घेतली, क्षणाचाही विलंब न करता तरुण जीव वाचवण्यासाठी धावला, प्रसंगावधानं सर्वत्र कौतुक

Nashik News : शहापूर तालुक्यातील सापगाव येथील भातसा नदीवरील पुलावरुन एका वृद्ध महिलेने नदीपात्रात उडी मारली. जीव देण्यासाठी नदीत उडी मारणाऱ्या महिलेला एका तरुणाने जीवाची पर्वा न करता वाचवले.

Yash Shirke

फैयाज शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

नाशिकमधील शहापूर येथून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शहापूरमध्ये एका वयोवृद्ध आजीने भातसा नदीच्या पात्रात उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नदीच्या बाजूला किनाऱ्यावर असलेल्या एका तरुणाने नदीत उडी मारुन आजीचे प्राण वाचवले. त्यानंतर आजीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील सापगाव येथील भातसा नदीवरील पूलावरुन एका वृद्ध महिलेने नदीत उडी घेतली. हे दृश्य पाहून नदीच्या दुसऱ्या बाजूच्या किनाऱ्यावर असलेल्या रितेश बसवंत या तरुणाने क्षणाचाही विलंब न करता भातसा नदीमध्ये उडी मारली. पोहत हा तरुण महिलेपर्यंत पोहोचला आणि त्याने वृद्ध महिलेला पाण्यातून बाहेर काढले.

नदीपात्रात उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आजीला वाचवणाऱ्या रितेश बसवंत याचे परिसरात कौतुक केले जात आहे. यादरम्यान वृद्ध आजीला प्राथमिक उपचारांसाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृद्ध महिलेने नदीत उडी मारण्याचा प्रयत्न का केला याचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT