Nashik Road Navale Chaul youth murder SaamTV
महाराष्ट्र

Nashik Crime : शिवजयंतीदिनी ढोल ताशांचा दणदणाट, गर्दीचा फायदा घेत तरुणाची हत्या; नाशिक हादरलं

Nashik Road Youth Murder : पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर मिळालेला मृतदेह हा सिन्नर फाटा येथील राहणारा अजय शंकर भंडारी याचा असून घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Prashant Patil

तरबेज शेख, साम टिव्ही

नाशिक : नाशिक शहरात काल शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उत्साहाचे वातावरण असताना नाशिकरोड परिसरातील नवले चाळ येथे एकाचा खून झाल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिकरोड भागातील नवले चाळ येथील मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. त्यांनी तात्काळ पोलिसांची संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

घटनास्थळी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर मिळालेला मृतदेह हा सिन्नर फाटा येथील राहणारा अजय शंकर भंडारी याचा असून घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला असून मारेकऱ्यांचा शोध नाशिक पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT