NASHIK RAIN ALERT: HOLIDAY DECLARED FOR SCHOOLS IN SIX TALUKAS, TOURIST SPOTS CLOSED 
महाराष्ट्र

मोठी बातमी! नाशिकच्या सहा तालुक्यातील शाळांना उद्या सुट्टी

Nashik School Holiday: मुसळधार पावसाचा 'येलो अलर्ट' असल्याने नाशिक जिल्हा प्रशासनाने सहा तालुक्यांमधील अंगणवाड्या, पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, धबधबे, ट्रेकिंगची ठिकाणे जाण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

Bharat Jadhav

  • नाशिक जिल्ह्यासाठी ९ जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • सहा तालुक्यांतील आंगणवाडी, प्री-स्कूल आणि प्राथमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर.

  • धबधबे, ट्रेकिंग पॉईंट्स आणि पूरप्रवण पर्यटनस्थळांवर १३ जुलैपर्यंत प्रवेशबंदी.

नाशिक जिल्ह्यासाठी उद्या ९ जुलैला 'यलो अलर्ट' जारी करण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान सुरक्षतेच्या दृष्टीने नाशिकच्या जिल्हा प्रशासनाने सहा तालुक्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी देण्यात आली आहे. आंगणवाडी, प्री-स्कूल आणि प्राथमिक अनिवासी शाळा उद्या बंद राहणार आहेत. मात्र इतर सर्व शाळा आणि महाविद्यालये नियमित सुरू राहणार आहे.

यासह जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व धबधबे, ट्रेकिंग पॉईंट्स आणि पूरप्रवण पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी करण्याचे आदेश देण्यात आलेत. १३ जुलै सकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश बंदी असणार आहे. पर्यटकांनी नदी, नाले, धरणे, पूल, घाट परिसर आणि भूस्खलनप्रवण भागात जाणे टाळावे असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. काल आणि आज पहाटे पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. ७ जुलै सकाळी साडे आठ ते ८ जुलै रोजी सकाळी साडे आठपर्यंत तब्बल २७० मिमी इतकी पावसाची नोंद करण्यात आली. शहरातील जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले. शहरातील प्रमुख नदी गोदावरी आणि नंदिनी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता.

नाशिक शहर सोबतच त्र्यंबकेश्वर येथे दोन दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याकडून ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर नाशिक शहराला देखील मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हा देण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT