Satyajit Tambe leads a road blockade protest demanding action on the Nashik-Pune High-Speed Railway Project. saam tv
महाराष्ट्र

Nashik-Pune High-Speed ​​Railway Project: महामार्गावर रास्ता रोको' आंदोलन करणं भोवलं; आमदार सत्यजित तांबेंसह 300 आंदोलकांवर गुन्हे दाखल

Nashik-Pune High-Speed Rail Protest: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मागणीसाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सत्यजित तांबे यांच्यासह 300 आंदोलकांवर वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bharat Jadhav

  • आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

  • समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्यात आले.

  • मावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सत्यजित तांबे यांच्यासह 300 आंदोलकांवर गुन्हे दाखल

आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात गोंदे शिवारात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आलं. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी आमदार तांबे यांच्यासह व इतर 300 आंदोलकांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर विधान परिषदेचे आमदार तांबे यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग जुन्याच आराखड्यानुसार नाशिक-सिन्नर-संगमनेर-चाकण मार्गे व्हावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केलीय. वावी पोलीस ठाण्यात आमदार तांबे यांच्यासह 300 ते 350 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ज्या मार्गाने रेल्वे ठरलीय त्यात बदल करू नका, या मागणीसाठी तांबे यांनी आंदोलन पुकरले होते. 22 फेब्रुवारी 2026 ला रेल्वेसाठी प्रश्न मांडला, त्यानुसार समिती नेमली आहे. आम्ही दोन मागण्या केल्या आहेत. काकोडकर समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देता कामा नये. काकोडकर यांना शास्त्रज्ञ म्हणून नेमले आहे, दोन विभागीय आयुक्त दिले आहेत, रेल्वे बोर्डाचा अधिकारी सुद्धा नेमला आहे. जनभावनेचा विचार केला जावा, फक्त तांत्रिक कारणांचा विचार करू नये आणि ठरल्याप्रमाणे हा मार्ग जुन्याच आराखड्याने झाला पाहिजे असं आमदार तांबे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT