Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Lady Doctor: नाशकात गरोदर महिला डॉक्टरने स्वतः ॲम्बुलन्स चालवून वाचवले रुग्णाचे प्राण; कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक

डॉ. प्रियंका पवार या स्वतः गरोदर असतानाही वेळेची गरज ओळखून एका तातडीच्या रुग्णासाठी रुग्णवाहिका चालवून प्राण वाचवले आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News : नाशिकमधील म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार या स्वतः गरोदर असतानाही वेळेची गरज ओळखून एका तातडीच्या रुग्णासाठी रुग्णवाहिका चालवून प्राण वाचवले आहे. त्याच्या या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (Latest Marathi News)

म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार या सेवेत आहेत. आज, एका तातडीचा रुग्ण त्यांच्या केंद्रात आला. मात्र, आज केंद्रातील रूग्णवाहिकेचे चालक रजेवर होते. त्यामुळे स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका चालवत विष प्राशन केलेल्या रुग्णाला निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात (Hospital) घेवून गेल्या आणि उपचार सुरू केले.

मांजरगाव येथील २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन केले असल्याने त्याचेवर तातडीने उपचाराची गरज होती. त्याला तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे येथे प्राथमिक उपचार केले.

रुग्णाला तातडीने पुढील संदर्भ सेवेची आवश्यकता असताना प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे येथील वाहनचालक रजेवर असल्याने बाका प्रसंग उद्भवला होता. याप्रसंगाला सामोरं जाण्यासाठी एक स्त्री त्यातही गरोदर असूनही सामोऱ्या गेल्या.

डॉ. प्रियंका पवार यांनी स्वतःचा विचार न करता आरोग्य सेवक संसारे यांना सोबत घेवून रुग्णवाहिका चालवत ग्रामीण रुग्णालय निफाड येथे तातडीने रुग्णाला घेऊन पोहोचल्या. त्यामुळे रुग्णाचा वेळेत पुढील उपचार सुरू झाला. या धाडसी कृतीचे कर्मचारी, नागरिकांकडून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार यांचे कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT