Mahayuti Clash In Nashik Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Politics: पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयावरून महायुतीत वादाची ठिणगी; राष्ट्रवादी-शिवसेना आमनेसामने

Mahayuti Clash In Nashik: देवळाली विधानसभा मतदारसंघातील भगूर नगरपरिषदेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत.

Bharat Jadhav

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

राज्यातील महायुतीच्या नेत्यांमधील नाराजी वेळोवेळी दिसून आलीय. आता महायुतीत श्रेय वादावरून जुंपण्याची शक्यता आहे. नाशिकमधील देवळाली मतदारसंघात महायुतीतच श्रेयवादाची लढाई सुरू झालीय. भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. परंतु याआधी या योजनेचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. आता याच पाणीपुरवठा योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची ठिणगी पडलीय.

नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीत वाद झाला होता आता श्रेयवाद सुरू झालाय. भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा राष्ट्रवादीमुळे पूर्ण झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी आमदार सरोज अहिरे यांच्यावर टीका केली. अजित पवार यांनी दोन दिवसापूर्वी या पाणी पुरवठ्याचे भूमिपूजन केले होतं. या सोहळ्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी अजित पवार यांनीही सरोज अहिरे यांची पाठराखण केली होती.

आता शिवसेनेच्या नेत्यांनी सरोज अहिरे यांच्यावर पलटवार केलाय. भगूर नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना आपल्याच पाठपुराव्यामुळे मंजूर झाली, असा दावा करत सरोज अहिरे यांनी श्रेय लाटलं. त्यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते सरोज अहिरे हे श्रेय घेत आहेत. परंतु आमच्या पाठपुराव्यामुळेच ही योजना मंजूर झाली होती असा, दावा शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी केलाय. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या दौऱ्याच्या दोन दिवस अगोदरच नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगूरला आपण पाणीपुरवठा योजना दिल्याचं सभेत जाहीर केलं होतं.

पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन ह सोहळ्यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचे शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केला होता. मला अनेक प्रकारचा त्रास झाला आहे, माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरूय. आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, पण मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा, असं सरोज म्हणाल्या. तुम्ही भगूरमध्ये तुम्ही काम करू नका, असं मला सांगितलं जातं, असंही सरोज म्हणाल्या. यानंतर अजित पवारांनी देखील सरोज अहिरे यांची पाठराखण केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT