MAJID SHEIKH CASTE CERTIFICATE CANCELLED: MANMAD SHINDE SENA COUNCILLOR FACES POLITICAL CRISIS Saam Tv
महाराष्ट्र

Political News : शिवसेनेच्या नगरसेवकाचं पद जाणार? काय आहे कारण

Maharashtra Nashik Political News : मनमाड नगरपालिकेचे शिंदे सेनेचे नगरसेवक मजीद शेख यांचे जात प्रमाणपत्र नाशिक विभागीय जात पडताळणी समितीने रद्द केले आहे. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Alisha Khedekar

  • नाशिक विभागीय जात पडताळणी समितीचा मोठा निर्णय

  • मजीद शेख यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले

  • समितीच्या निर्णयामुळे मजीद शेख यांचे नगरसेवक पद धोक्यात

  • या निर्णयामुळे मनमाडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अजय सोनावणे,नाशिक

Nashik Manmad Shivsena Eknath Shinde News नाशिकच्या मनमाडमधून राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपालिकेचे शिंदे सेनेचे नगरसेवक मजीद शेख यांचं पद धोक्यात असल्याची माहिती समोर आली आहे. कारण नगरसेवक मजीद शेख यांचे जात प्रमाणपत्र नाशिक विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केलं असून ते अवैध असल्याची माहिती आहे. समितीच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले असून आगामी काळात या प्रकरणाचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मजीद शेख यांनी मनमाड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘मोमीन’ या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत नगरसेवकपद पटकावले होते. मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत निवडणुकीनंतर आक्षेप घेण्यात आला. त्यांचे प्रतिस्पर्धी विजय मिश्रा आणि रिजवाना शेख यांनी संबंधित प्रमाणपत्राविरोधात अपील दाखल करत पडताळणीची मागणी केली होती.

यानंतर हे प्रकरण नाशिक विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणीसाठी आले. समितीने उपलब्ध कागदपत्रे, पुरावे आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेत सविस्तर सुनावणी केली. सुनावणीनंतर समितीने मजीद शेख यांचे जात प्रमाणपत्र वैध नसल्याचा निष्कर्ष काढत ते रद्द करण्याचा आदेश दिला. या निर्णयामुळे मनमाडमधील राजकीय वातावरण तापले असून विविध राजकीय पक्षांकडून यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. विरोधकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून कायद्याच्या चौकटीत राहून झालेल्या कारवाईचे समर्थन केले आहे. तर मजीद शेख समर्थकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला असल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मजीद शेख या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे मनमाडमधील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून पुढील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT