nashik, crime news Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News : नाशिक पाेलीस दलाची धडाकेबाज कामगिरी, बनावट दारु कारखान्यावर छापा; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीसांच्या धाडसी कामगिरीचे काैतुक हाेत आहे.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik Crime News : नाशिक पाेलीस दल धडाकेबाज कामगिरी करीत असून येवला शहरातून पाेलीसांनी 11 दुचाकीसह तीन जणांना घेतले. दूसरीकडे नाशिकच्या देवळा तालूक्यातील डोंगरगाव परिसरात बनावट दारु कारखान्यावर छापा टाकून १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Maharashtra News)

नाशिकच्या येवला शहरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घालत शहरातील विविध ठिकाणी दुचाकी चोरी केल्या. यानंतर शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करीत तीन संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

त्यांच्या ताब्यातून अकरा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक तपास उपविभागीय अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस करीत आहेत.

बनावट दारु कारखान्यावर पोलिसांचा छापा

नाशिक जिल्ह्यात पोलिसांनी अवैध दारु विरोधात मोहिम उघ़लेली असतांनाच गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने नाशिकच्या देवळा तालूक्यातील डोंगरगाव परिसरात छापा टाकला.

देशी आणि विदेशी मद्य तयार करणा-या एका गोडाऊन मधून दारु तयार करणारे साहित्य तसेच मशीन,बाटल्या आणि तयार झाल्यावर त्यावर विक्री साठी पाठवतांना मारले जाणारे शिक्के आणि दारु तयार झालेल्या दारुच्या बाटल्या असे एकुण 10 लाखाचा मुद्देमाल पाेलीसांनी जप्त केला. हा कारखाना चालविणा-या दोघांवर पाेलिसांनी करावाई केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT