nashik news saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : दराेड्याच्या तयारीतील चाळीसगावची टाेळी काठे गल्ली सिग्नलनजीक शस्त्रासह जेरबंद

पाेलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पकडली टाेळी.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik News : नाशिक शहरात दरोडा टाकण्याच्या हेतूने आलेल्या टाेळीला भद्रकाली पोलिसांनी अतिशय शिताफीने अटक केली. त्यामुळे राज्यातील पोलीस ज्या टोळीचा शोध घेत होते ती टोळी अखेर नाशिक पोलिसांच्या कामगिरीमुळे जेरबंद झाली आहे. (Maharashtra News)

मागील काही दिवसांपासून राज्यात पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी दरोडे करणाऱ्या टोळीचा शोध घेत होते. त्यांचा शाेध लागत नव्हता. अखेरीस या टोळीला भद्रकाली पोलिसांनी अतिशय शिताफीने गुरुवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास काठे गल्ली सिग्नल जवळ अटक केली.

या टोळीकडून एक पिस्तूल तसेच घरफोडी करणारे हत्यारे, दरोडे टाकण्यासाठी लागणारे हत्यार, काडतुस आदी जप्त केले आहे. हे सर्व संशयित आरोपी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील आहेत. यातील संशयित आरोपी असलम शेख यावर यापूर्वी जळगाव मध्ये तडीपारीची कारवाई झालेली आहे.

यामध्ये विशाल राजभर, अजय हिरामण, राठोड दानिश रशीद मणियार, नसिरुद्दीन फरुद्दीन शेख या संशयित आरोपींना अटक (arrest) केली आहे अशी माहिती किरणकुमार चव्हाण ( पोलिस उपायुक्त नाशिक) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या

Maharashtra News Live Update: पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

निवृत्त DIG च्या घरावर ईडीचा छापा; तब्बल ५३ कोटींची संपत्ती जप्त

Gaurav and Akanksha: 'आम्ही वर्षभरापासून वेगळे राहतोय'; बिग बॉस विजेता गौरव खन्ना आणि आकांक्षा यांचा ९ वर्षांचा संसार मोडला

High Blood Pressure : वयाच्या 30-40 मध्येच वाढतोय BP? जाणून घ्या यामागची मोठी कारणं

SCROLL FOR NEXT