Nashik Hospital अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

नाशिक: पतंगोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोटारसायकल स्वाराचा चिरला गळा!

मोटारसायकल स्वाराच्या गळ्याला 20 टाके पडले

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक: मकर संक्रांतीचा सण साजरा करताना नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज सकाळीच नाशिककरांना केले होते. परंतु पतंगोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नायलॉन मांजामुळे मोटारसायकल स्वाराचा गळा चिरल्याची घटना येवल्यातून समोर आली आहे. (Latest Nashik News In marathi)

येवला शहरातून अंगणगावला निघालेल्या मोटारसायकल स्वाराचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला आहे. गळा चिरला गेल्यानं मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी मोटारसायकल स्वाराला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटारसायकल स्वाराच्या गळ्याला 20 टाके पडले आहेत. नायलॉन मांजावर बंदी असतांनाही येवल्यात चोरीछुपे नायलॉन मांजाचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर, आजपासून येवल्यात 3 दिवसांच्या पतंगोत्सवाला सुरुवात झाली असतानाच, पतंगोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नायलॉन मांजाने एक जण जखमी झाला आहे.

दरम्यान, मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) राज्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री छगन भुजबळ आज म्हणाले होते की, "मकर संक्रांतीचा सण म्हंटल्यावर अनेक नागरिक मोठ्या उत्साहाने पतंग (Kite) उडवत असतात. मात्र आपला सण साजरा करताना इतर कोणालाही इजा होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. पतंग उडवताना मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाचा (Nylon Manja) वापर तरुणांकडून होत असतो नायलॉन मांजामुळे पशु-पक्ष्यांना तसेच मानवी जीवीताला देखील धोका असल्याने नायलॉन मांजा न वापरता पारंपरिक मांजा वापरून उत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी यावेळेस केले होते.

"संक्रांतीचा सण संपूर्ण राज्यभरात उत्साहात साजरा होत असतो, मात्र देशभरात कोरोना (Corona) संकटाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे सण साजरे करत असतानाच आपल्या आरोग्याची काळजी देखील आपण घ्यायला हवी. गरज नसल्यास घराबाहेर जाणे टाळा, मास्कचा वापर करा, हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे" असे आवाहन देखील त्यांनी यानिमित्ताने केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

SCROLL FOR NEXT