Dhule Dadar Express Saam tv
महाराष्ट्र

Dhule Dadar Express : धावत्या धुळे- दादर एक्सप्रेसमधून निघाला धूर, प्रवाशांचा उडाला गोंधळ; निफाड रेल्वे स्थानकादरम्यानची घटना

Nifad Nashik News : मध्य रेल्वेवरील नाशिक जिल्ह्यातील निफाड रेल्वे स्थानकाजवळ नाशिकच्या दिशेने लासलगाव येथून सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान निघालेली धावत्या धुळे-दादर एक्सप्रेसच्या डी २ बोगी खालील भागातून धूर

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
निफाड (नाशिक)
: धुळ्याहून दादरला निघालेल्या एक्सप्रेसच्या बोगीमधून अचानक धूर निघू लागला. धावत्या रेल्वेमध्ये (Railway) ही घटना घडल्याने एक्सप्रेसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. ही घटना निफाड रेल्वे स्थानकादरम्यान घडली. (Tajya Batmya)

मध्य रेल्वेवरील (Nashik) नाशिक जिल्ह्यातील निफाड रेल्वे स्थानकाजवळ नाशिकच्या दिशेने लासलगाव येथून सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान निघालेली धावत्या धुळे-दादर एक्सप्रेसच्या डी २ बोगी खालील भागातून धूर निघू लागला होता. धावत्या गाडीतून अचानक धूर निघू लागल्याने बोगीतील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. यामुळे ही रेल्वे गाडी निफाड स्थानकावर थांबवण्यात आली.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ब्रेक चिकटल्याने निघाला धूर 

चाकाला प्लास्टिकचा ब्रेक चिटकल्याने दूर निघत असल्याचे लक्षात आले. यानंतर सदर ब्रेक दुरुस्त करत गाडी नाशिकच्या दिशेने रवाना झाली. निफाड येथे धुळे- दादर एक्सप्रेस थांबवण्यात आल्याने या गाडीतील चाकरमान्यांचे वेळेत कामावर पोचण्यासाठी हाल झाल्याची चित्र पाहवयास मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ४ आरोपींना दिलासा

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, अडचणींवर मात करत केली MPSC क्रॅक; सोलापूरच्या शेतकऱ्याची लेक झाली सरकारी अधिकारी

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Crime news India: IRS ऑफिसरच्या मुलीची हत्या; आधी लैंगिक अत्याचार, नंतर मोबाइलच्या चार्जरने गळा आवळला

Long Hair Hairstyles: लांब केसांसाठी 5 मिनिटांत होणाऱ्या सोप्या हेअरस्टाईल्स कोणत्या?

SCROLL FOR NEXT