Nifad Crime Saam tv
महाराष्ट्र

Nifad Crime : चोरी करून लपला ऊसाच्या शेतात; शेताला घेराव घालत फिल्मी स्टाईलने चोरट्याला पकडले

Nashik Nifad News : घरातील महिला मंडळी शेतातून घरी आल्या असताना त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून मोटरसायकलवरून पळण्याच्या तयारीत होते

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : शेतकरी कुटुंब शेतात असताना घराचे कुलूप तोडून सुमारे ३ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल घेऊन (Nashik) चोरटा फरार होण्याच्या तयारीत होता. यावेळी घरातील महिलांनी आरडाओरड केल्याने शेतात लपून बसलेल्या या चोरट्याला पोलिसांनी (Police) नागरिकांच्या मदतीने शेताला घेराव घालून ताब्यात घेतले. (Tajya Batmya)

नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी येथील शेतकरी शिवाजी भोर व कुटुंब शेतामध्ये दुपारी काम करत असताना संधीचा फायदा घेऊन छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील भाबरगाव येथील गोरख चव्हाण या कुख्यात गुंडाने घराचे कुलूप तोडून कपाटातील १० तोळे सोन्याची दागिने व ३० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून पोबार करण्याच्या तयारीत होता. याच वेळी घरातील महिला मंडळी शेतातून घरी आल्या असताना त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून मोटरसायकलवरून पळण्याच्या तयारीत होते. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र महिलांनी आरडाओरडा केला असता तो उसाच्या शेतात जाऊन लपला. याची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन टीम व पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने संपूर्ण ऊसाला घेराव घालत फिल्मी स्टाईलने शोध घेत तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर चोरटा गोरख चव्हाण याला पकडण्यात यश आले. या दरम्यान पोलीस कर्मचारी अनिल गडाख यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न या गुंडाकडून करण्यात आल्याने ते जखमी झाले आहेत.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

SCROLL FOR NEXT