Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime: दारूचे पैसे मागितल्याच्या रागातून कामगाराला मारहाण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Nashik News : दुकानाचे व्यवस्थापक विक्रमजीत सिंग यांना दुकानाबाहेर काढून दिले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: दारू घेतल्यानंतर त्याचे पैसे मागितले. याचा राग आल्याने चौघांनी मिळून कामगारास मारहाण केल्याची घटना (Nashik) नाशिक- पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील कॅपिटल वाईन शॉपमध्ये घडली. कामगारास मारहाण करत दगड मारून जखमी केल्याची संपूर्ण घटना (CCTV) सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. (Tajya Batmya)

रवींद्र बहादूर नामदेव असे मारहाण झालेल्या कामगाराचे नाव आहे. शिवाजीनगर परिसरातील दिपनगर परिसरातील कॅपिटल वाईन शॉपमध्ये रवींद्र विजय बहादूर नामदेव हा युवक कामाला आहे. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रवींद्र हा दुकानात काम करत असताना चार जण दारू घेण्यास आले. यावेळी रवींद्र याने त्यांना दारूच्या बाटल्या काढून दिल्यानंतर पैसे मागितले. (Crime News) पैसे मागायला इतकी घाई का करतो? असे त्या चौघा युवकांनी बोलल्याने रवींद्र याने काउंटरवर ठेवलेल्या दारूच्या बाटल्या पुन्हा दुकानात ठेवून दिल्या. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाटल्या परत उचलून नेल्याने त्याचा राग आल्याने चौघे युवक जबरदस्ती दुकानात घुसले. यानंतर शिवीगाळ करत त्यांनी रवींद्र व त्याच्यासोबत काम करणारा सोनुकुमार कनोजिया यांना मारहाण केली. दुकानाचे व्यवस्थापक विक्रमजीत सिंग यांना दुकानाबाहेर काढून दिले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT