Nashik City Water Supply Shutdown Saam Tv
महाराष्ट्र

Nashik City News : नाशिककरांसाठी मोठी बातमी! 'या' दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद, काय आहे कारण?

Nashik City Water Supply Shutdown : नाशिकच्या गंगापूर, मुकणे धरणांवर अत्यावश्यक कामांमुळे महापालिकेतील सर्व जलशुद्धीकरणाची केंद्रे बंद राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही.

Yash Shirke

Nashik Water Supply : शनिवारी (१ फेब्रुवारी) रोजी संपूर्ण नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी (२ फेब्रुवारी) सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. गंगापूर, मुकणे धरणांवरील विद्युतविषयक कामांमुळे महानगरपालिकेतील सर्व जलशुद्धीकरण केंद्रे बंद राहणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

गंगापूर धरणावर महानगरपालिकेच्या पंपिंग स्टेशनसाठी १३२ केव्ही सातपूर व महिंद्र या दोन फिडरवरुन ३३ केव्ही उच्च दाबाचा वीजपुरवठा होतो. शिवाय बारा बंगला. शिवाजीनगर, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर व नाशिक रोड येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे रॉ वॉटरचा पुरवठा करण्यात येतो. तर मुकणे धरणातील पंपिंग स्टेशनला गोंदे येथील रेमंड सबस्टेशन येथून एक्सप्रेस फिडरद्वारे जॅकवेलसाठी ३३ केव्हीचा वीजपुरवठा केला जातो.

गंगापूर धरण येथे नवी थेट जलवाहिनीच्या अंतर्गत नवे पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी ३३ केव्ही दाबाच्या वीजवाहिन्या शिफ्ट करणे, सबस्टेशन,पंप हाऊसमधील विद्युतविषयक कामे शनिवारी केली जाणार आहेत. तर मुकणे धरण पंपिंग स्टेशनवरील सबस्टेशन,पंप हाऊसमधील विद्युतविषयक कामे हाती घेण्याच नाशिक महानगरपालिकेचे नियोजन आहे.

गंगापूर आणि मुकणे धरणाद्वारे पंपिंग करता येणार नसल्याने सर्व जलशुद्धीकरण केंद्रे बंद असणार आहेत. यामुळे शनिवारी शहरात पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय रविवारी सकाळी कमी दाबाने पाणी येणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT