Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : नाफेडच्या खरेदी केंद्रांवर गैरकारभार; अध्यक्षांच्या भेटीत आले उघडकीस, केंद्रांची होणार चौकशी

Nashik News : शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा या उद्देशाने नाफेडमध्ये खरेदी केली जात असते. मात्र काही व्यापारी एजंट आणि अधिकारी गोंधळ करत असल्याचं निदर्शनास आले आहे

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : शेतकऱ्यांकडून नाफेडकडून शेतीमाल खरेदी केला जात असतो. त्यानुसार नाफेडकडून कांदा खरेदी केलेल्या केंद्रांवर गैरकारभार झाल्याचे समोर आले आहे. नाफेडच्या अध्यक्षांनी अचानक केंद्रावर जाऊन केलेल्या तपासणीत हा गैरकारभार उघडकीस आला आहे. 

शेतकऱ्यांना (Farmer) चांगला भाव मिळावा या उद्देशाने नाफेडमध्ये खरेदी केली जात असते. मात्र काही व्यापारी एजंट आणि अधिकारी गोंधळ करत असल्याचं निदर्शनास आले आहे. दरम्यान कांदा खरेदी करण्यात आलेल्या केंद्रांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. या तक्रारीवरून नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी (Nashik) नाशिक जिल्ह्यातील नाफेडच्या कांदा खरेदी विक्री केंद्रांवर अचानक जाऊन तपासणी केली. अध्यक्षांच्या या भेटीत नाफेडच्या खरेदी केंद्रांवरील गैर कारभार उघड झाला आहे.

समिती नेमून होणार चौकशी 

नाफेडच्या अनेक केंद्रांवर गैर कारभार आढळून आला आहे. यामध्ये नाफेडचे अनेक अधिकारी देखील गैरकारभार करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान नाफेडच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी समिती गठित करणार असून नाफेडच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, तसेच काही व्यापारी आणि एजंट यांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करणार. यासाठी दिल्लीत एक कमिटी तयार करणार असून समितीमार्फत केंद्रांची तपासणी केली जाईल; असे नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राहुल गांधींच्या परीक्षेत 50% सचिव नापास; परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेस यश मिळणार?

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT