Nashik News Saam TV
महाराष्ट्र

Nashik News: त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर आजपासून बंद; मंदिर प्रशासनाने का घेतला हा निर्णय?

५ जानेवारी २०२३ पासून १२ जानेवारी २०२३ पर्यंत हे मंदिर बंद ठेवण्यात येत आहे.

Ruchika Jadhav

Nashik News: नाशिकचे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून बंद राहणार आहे. त्यामुळे पुढचे आठ दिवस भाविकांना दर्शनासाठी येता येणार नाही. श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी ८ दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. ( Trimbakeshwar Jyotirlinga Temple Closed News)

अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन तसेच देखभाल यासाठी ५ जानेवारी २०२३ पासून १२ जानेवारी २०२३ पर्यंत हे मंदिर बंद ठेवण्यात येत आहे. मंदिर प्रशासनाने याविषयी माहिती देत सांगितले आहे की, पुढचे आठ दिवस मंदिरात कोणतेही काम होणार नाही. मंदिराच्या संरक्षण कामांसाठी या काळात काम केले जाईल.

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची झीज होत आहे अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. अशात आता मंदिर प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरून याच कामासाठी मंदिर बंद ठेवल्याचे म्हटले जात आहे. मंदिरात शिवलिंगावर आठ वर्षांआधीच वज्रलेप लावण्यात आला होता. हा लेप एका बाजून निघाला आहे. मंदिरात ज्योतिर्लिंगावर होत असलेली झीज आणि बदल लक्षात घेता कामासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

मंदिराची ही सर्व कामे पुरातत्व खात्यामार्फत केली जाणार असल्याचे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने म्हटले आहे. सर्व भाविकांनी मंदिर बंद असल्याची नोंद घ्यावी तसेच मंदिर प्रशासनाला कामात सहकार्य करावे असे देखील प्रशासनाने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT