Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : दीड कोटीच्या पैठणींची चोरी; येवला शहरातील घटना, चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीसीआरही लांबविला

Nashik News : रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शोरुमच्या दुकानाची खिडकी तोडत आत प्रवेश केला. यानंतर दुकानातील महागड्या पैठण्या चोरुन नेल्या

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या येवला शहरातील नगर- मनमाड मार्गावर असलेल्या लक्कडकोट या पैठणीच्या दुकानातून काल रात्रीच्या सुमारास चोरी झाली आहे. या दुकानातून सुमारे दीड कोटी रुपयांच्या पैठणी चोरटयांनी चोरून नेल्या आहेत. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.   

नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील येवला शहरातील नगर- मनमाड मार्गावर असलेल्या लक्कडकोट पैठणी दुकानात हि चोरी झाली आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शोरुमच्या दुकानाची खिडकी तोडत आत प्रवेश केला. यानंतर दुकानातील महागड्या पैठण्या चोरुन (Theft) नेल्या आहेत. सदर घटना सकाळी दुकानचे मालक सुनिल लक्कडकोट यांच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना फोन करुन माहिती दिली.

चोरट्यांनी महागड्या पैठणी साड्या बरोबरच शोरूममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचा डीसीआर देखील पळवून नेला आहे. यामुळे पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान उभे आहे. दरम्यान पोलिसांनी डॉग स्कॉड घटनास्थळी आणत चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे. एकुणच प्रथमच एवढ्या मोठ्या रकमच्या महागड्या पैठणी चोरी झाल्याने येवला तालूक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT