Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: नवविवाहित जोडप्‍याची आत्‍महत्‍या; आर्थिक कारण येतेय समोर

नवविवाहित जोडप्‍याची आत्‍महत्‍या; आर्थिक कारण येतेय समोर

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

नाशिक : नवविवाहित जोडप्याने राहते घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्थिक कारणावरून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. (Live Marathi News)

नाशिकच्या (Nashik) पाथडी शिवारात नयनतारा गोल्ड या आलिशान सोसायटीत हा प्रकार उघडकीस आला आहे. नयनतारा गोल्ड येथील ई इमारतीमध्ये राहणारे गौरव जगताप (वय २८) आणि नेहा जगताप (वय २४) हे नवविवाहीत जोडपे राहत होते. रविवारी दिवसभरात कधी तरी या जोडप्याने घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. गौरव यास मावशीने संपर्क केला असता दोघांनी प्रतिसाद दिला नाही.

मावशीने गौरवच्या लहान भावाला फ्लॅटवर पाठवले. दरवाजा उघडत नसल्याने फ्लॅटचा दरवाजा तोडून आत पाहिले असता दोघांनी गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. यानंतर पोलिसांनी (Police) मृतदेह खाली काढून पंचनामा केला. आर्थिक कारणातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पती– पत्नी दोघांच्या नातेवाईकांचे जबाब घेण्यात येणार आहे. वरिष्ठ निरिक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Shweta Tiwari: 'चाळीशीतही क्यूट दिसतेस' श्वेता तिवारीचे नवीन फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Shocking: आई-बापाने काबाड कष्ट करत म्हशी घ्यायला पै पै जमवली, मुलानं 'फ्री फायर' गेमसाठी ५ लाख उडवले

GK: भारतातील सर्वात लहान दोन अक्षरांचे नाव असलेले रेल्वे स्टेशन कोणते?

SCROLL FOR NEXT