Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: टांगा, दुचाकीला ट्रकची धडक; तीन युवकांचा मृत्‍यू, मुंबई- नाशिक महामार्गावर अपघात

टांगा, दुचाकीला ट्रकची धडक; तीन युवकांचा मृत्‍यू, मुंबई- नाशिक महामार्गावर अपघात

साम टिव्ही ब्युरो

इगतपुरी (नाशिक) : मुंबई- नाशिक महामार्गाजवळील इगतपुरी शहराच्या बायपासजवळ रात्री भीषण अपघात झाला. यात बोरटेंभे येथील तीन युवक जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल केले आहे. (Letest Marathi News)

मुंबई- नाशिक (Nashik) महामार्गावरील पंढरपुरवाडी भागात रात्री ९ वाजेच्या सुमारास घाटनदेवी येथुन बोरटेंभेकडे जाणाऱ्या टांग्याला आणि मोटार सायकलला भरघाव वेगाने जात असलेल्‍य टेम्पोने धडक दिली. या भीषण (Accident) अपघातात ३ युवकांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व जण बोरटेंभे येथील रहिवासी असुन ह्या घटनेमुळे बोरटेंभे गावात शोककळा पसरली आहे.

ट्रक चालक फरार

रात्रीच्‍या सुमारास झालेल्‍या अपघातामुळे सदर अपघातानंतर आयशरचा चालक फरार झाला. इगतपुरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अपघातामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT