Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: सिटी लिंक बसवर माथेफिरूंकडून दगडफेक; प्रवाशी सुखरूप

सिटी लिंक बसवर माथेफिरूंकडून दगडफेक; प्रवाशी सुखरूप

साम टिव्ही ब्युरो

तरबेज शेख

नाशिक : सिडको परिसरातील माथेफिरू युवकांकडून सिटी लिंक बसवर दगडफेक करण्यात आली. ही सगळी घटना एका प्रवासाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे. बस फोडतांनाचा विडिओ समोर आला आहे. घटनेचे वेळेस बसमध्ये वीस ते तीस प्रवासी होते. (Tajya Batmya)

नाशिकच्या सिडको परिसरात मंगळवारी रात्री सिम्बॉयसिस कॉलेज या ठिकाणाहून नाशिक रोडकडे प्रवासी घेऊन जाणारी सिटीलींक बस (क्रत्र एमएच १५ जीव्हि ७७४८) रात्री दहा वाजेच्या सुमारास सावतानगर बस स्टॉप येथे उभी होती. यावेळी अचानक महापालिकेच्या सिटी लिंक बसला भररस्त्यात एका माथेफिरूने बस चालकाला शिवीगाळ करीत थेट बसवर दगडफेक करीत बसची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रवाशानेच कळविले पोलिसांना

कोणास काही सुचन्याआधीच अचानक सुरु झालेल्या या प्रकारमुळे चालक, वाहक व प्रवासी याच्‍यात भीतीचे सावट निर्माण झाले होते. हा प्रकार सुरु असताना एका जागरूक नागरिकांने हा प्रकार बघताच तात्काळ पोलिसांच्या हेल्प लाईन नंबरवर संपर्क साधून पोलीस प्रशासनास कळवले. पोलिसांनी घटनास्थळ गाठत संशयित आरोपीस ताब्यात घेतले.

संशयित ताब्‍यात

याप्रकरणी सिटी लिंक बस चालक सचिन दिलीप गायकवाड यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित अतुल महादू देवरे (वय २६ रा. सावतानगर सिडको) यास अटक केली आहे. अंबड पोलीस ठाण्यात संशयित अतुल देवरे यांच्या विरोधात महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Ladki Bahin Yojana : ₹१५०० रुपयांचा बंद झालेला हप्ता व्हॉट्सअ‍ॅपवरून सुरू होणार? लाडक्या बहिणींनो, अर्ज करण्यापूर्वी हे नक्की वाचा

४ नोव्हेंबरपूर्वी ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होणार; E-KYC करावी लागणार का? जाणून घ्या नवी अपडेट

SCROLL FOR NEXT