Chandwad Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Chandwad Vidhan Sabha : नाशिकच्या चांदवड मतदारसंघात काँग्रेसमध्ये फूट; काँग्रेस तालूकाध्यक्षाची बंडखोरी

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील चांदवड मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेस उमेदवार शिरिष कोतवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या चांदवड मतदार संघात बंडखोरीला ग्रहण लागले असल्याची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अगोदर भाजपमध्ये आणि आता कॉंग्रेसमध्ये बंडखोरीची लागण झाली आहे. काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी बंडखोरी केली असून मतदारसंघात काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे पाहण्यास मिळत आहे.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवड मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेस उमेदवार शिरिष कोतवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र उमेदवारीसाठी तालूक्याच्या गावागावत फिरून प्रचार करणारे चांदवड तालूका (Congress) कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जाधव हे इच्छूक असतांना ऐन वेळी त्यांची उमेदवारी रद्द केल्याचा आरोप करत उमेदवारी माजी आमदार शिरिष कोतवाल यांना देण्यात आली आहे. यामुळे चांदवड तालूक्यातील कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडत दोन गट निर्माण झाले असून संजय जाधव यांनी मेळावा घेत आपली खंत यावेळी बोलून दाखवली आहे.

दरम्यान संजय जाधव यांना मनोज जरांगे यांचा फोन आल्याचे माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मिळाली असून त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारा समोर मोठे आवाहन उभे राहिले आहे. आता चांदवड मतदारसंघात काँग्रेस उमेदवार कोतवाल व बंडखोरी केलेले जाधव यांच्यातील लढत कशी राहील हे येणाऱ्या काळातच समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

SCROLL FOR NEXT