Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकने उडविले; येवल्यात वाहतूक व्यवस्थेचा बळी

Nashik News : रस्ता ओलांडत असताना मालवाहू ट्रकने या व्यक्तीला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
नाशिक
: येवल्यातील अपघातांचा सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. महिन्याभरात रस्त्या अपघातामध्ये चार ते पाच जणांचे बळी गेले असून आज सकाळी पुन्हा एकाचा पादचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. सकाळी एक इसम रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने जोरदार धडक देत त्याला उडविले. यात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती.  

नाशिकच्या येवला शहरातील विंचूर चौफुली या ठिकाणी विस्कटलेल्या वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक बळी गेला आहे. सकाळी झालेल्या अपघातात राजन नारायण मिस्किन असं अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रस्ता ओलांडत असताना मालवाहू ट्रकने या व्यक्तीला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. 

बायपास मार्गाची मागणी 

दरम्यान येवला येथे मागील महिनाभरापासून अपघाताचे सत्र सुरु असून यात आतापर्यंत चार ते पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात आजच्या अपघाताची भर पडली आहे. यामुळे प्रशासन आणखी किती बळी जाण्याचे वाट पाहत असून शहराला लवकरात लवकर बायपास व्यवस्था करावी; अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.  

भरधाव कार दुकानात शिरली

नांदेड : नांदेड शहरातील काबरा नगर ते पावडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधावकार दुकानात शिरली. हा अपघात रात्री अडीच वाजताच्या सुमारास झाला आहे. कारमध्ये तिघे जण होते. कार चालक दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन्हीही दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Gas Cylinder : ग्राहकांसाठी मोठी बातमी! वर्षाला ६ सिलिंडर मिळणार मोफत; कुठे आणि कोणासाठी लागू केला आहे हा निर्णय? वाचा

वर्षांपूर्वी रस्ता बांधताना आक्षेप घेतला नाही म्हणून भरपाई नाकारता येईल का? उच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं...

Asian Games 2026: भारताला दुसरं गोल्ड! कमलजीत-सुरुचीची जोडी ठरली भारी, एशियन गेम्समध्ये रचला विक्रम

Maharashtra News Live Update : नंदुरबार: प्रथम माणाचा गणपती असलेल्या दादा आणि बाबा गणपतीचा रथ दोरीने ओढत विसर्जन मिरवणुकीला सुरुवात..

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी पायांवर दिसतात 'हे' ५ संकेत, वेळीच व्हा सतर्क

SCROLL FOR NEXT