Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : आजारी पडलेल्या मुलाला उलटे टांगत बेदम मारहाण; निर्दयी पित्याचे धक्कादायक कृत्य, आईची पोलिसात तक्रार

Nashik News : मुलाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पत्नी सुनीता बेंडकुळे हिने पोलिसात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरुन वडनेर- भैरव पोलिसात गुन्हा दाखल

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : आजारी मुलाला दवाखान्यात जास्त पैसे लागत असल्याच्या कारणावरून निर्दयी पित्याने पाच वर्षाच्या चिमुकल्याला दोरीने उलटे टांगले. यानंतर त्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या चांदवड तालूक्यातील धोतरखेडे येथे घडला आहे. या प्रकरणी आईने पित्या विरोधात तक्रार दिली आहे. 

नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील धेतरखेडे येथे राहणाऱ्या मंगेश नंदू बेंडकुळे यांचा पाच वर्षाचा मुलगा आजारी पडला होता. त्याला उपचारासाठी वडाळी- भोई येथे दवाखान्यात घेऊन गेले होते. मात्र दवाखान्यात औषधोपचारासाठी जास्त पैसे खर्च झाल्याने बापाला संताप आला. या संतापात त्याने निर्दयतेचा कळस गाठत संतापलेल्या बापाने आजारी मुलाला छताला दोरीने उलटे टांगले. यानंतर त्याला बेदम मारहाण केली. पत्नीला देखील हाणमार (Crime) केली. मुलाला सोडविण्यासाठी जाणाऱ्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. 

पोलिसात दिली तक्रार 

दरम्यान मुलाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पत्नी सुनीता बेंडकुळे हिने पोलिसात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरुन वडनेर- भैरव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून कौटूंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. याबाबत (Police) पोलिस या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार ब्राम्हणे करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT