Chhagan Bhujbal/Sharad Paawar Saam TV
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: '...म्हणून शरद पवारांना जाणता राजा म्हणतात; राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी सांगितलं कारण

"जो जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे? आम्ही म्हणतो, तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा," असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

Gangappa Pujari

Nashik: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विधानावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. छत्रपती संभाजी राजेंना धर्मवीर नव्हेतर स्वराज्यरक्षक म्हणा असे विधान अजित पवार यांनी केले होते. यावरुनच या वादाला सुरुवात झाली होती. काल पत्रकार परिषद घेत अजित पवार यांनी याबद्दल आपली भूमिकाही स्पष्ट केली होती.

या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी शरद पवारांना जाणता राजा म्हणतात यावरुन ही त्यांनी विधान केले होते. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये बोलताना मोठे विधान केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना जाणता राजा का म्हणतात याचे स्पष्टिकरणच दिले आहे. यावेळी बोलताना, "गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार हे तळागाळातील लोकांची कामे करत आहेत. त्यामुळे लोक त्यांना जाणता राजा म्हणतात," असे उत्तर भुजबळांनी दिले आहे. 

शरद पवार यांना दिली जाणारी जाणता राजा ही पदवी मला मान्य असल्याचेही ते यावेळी म्हणाले. शरद पवार यांच्यासोबत मी अनेक वर्षांपासून फिरतो आहे. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांवर लक्ष देत ते सोडवले आहेत.

"यामध्ये महिलांचे प्रश्न असतील, विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं. जो जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे? आम्ही म्हणतो, तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा," असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

दरम्यान, अजित पवारांच्या (Ajit Pawar) पत्रकार परिषदेनंतरही त्यांच्यावर जोरदार टीका होत असून भाजपा आमदार नितेश राणे यांनीही गुगलवर धरणवीर सर्च केल्यास अजित पवारांचे नाव येते अशी टीका त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे अजित पवार आणि नितेश राणे यांच्यामधील वाद वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT