Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : अॅपल कंपनीची बनावट एक्सेसरीज विक्री; ५ मोबाइल विक्रेत्या दुकानदारांना अटक

Nashik News : नाशिकच्या एमजी रोडवरील दुकानावर हि कारवाई करण्यात आली आहे. या दुकानातून अँपल कंपनीच्या बनावट अँक्सेसरीज विक्री केली जात असल्याबाबत नाशिकच्या भद्रकाली पोलिसांत तक्रार दाखल होती

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : नाशिक शहरात मोबाईल दुकानांमध्ये अँपल कंपनीच्या मोबाईलचे ऍक्सेसरीज विक्री केली जात होती. याबाबत भद्रकाली पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्या मोबाईल दुकानांवर धाड टाकत कारवाई केली आहे. साधारण पाच दुकानांवर कारवाई करत तेथील बनावट साहित्य जप्त केले आहे. 

नाशिकच्या (Nashik) एमजी रोडवरील दुकानावर हि कारवाई करण्यात आली आहे. या दुकानातून अँपल कंपनीच्या बनावट अँक्सेसरीज विक्री केली जात असल्याबाबत नाशिकच्या भद्रकाली पोलिसांत तक्रार दाखल होती. या तक्रारीवरून सदरच्या मोबाईल दुकानांमध्ये पोलिसांनी (Police) धाड टाकत कारवाई केली. यात परिसरातील मॉजीसा मोबाईल, एजीएम कॉर्पोरेशन, रिद्धी सिद्धी एम्पेक्स, बालाजी मोबाईल, आशापुरा मोबाईल या दुकानांमध्ये पोलिसांनी तपासणी करत कारवाई केली आहे. 

साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त 

अँपल कंपनीच्या बनावट अँक्सेसरीज विक्री होत असल्याबाबत कल्याणमधील रहिवाशी कुंदन बेलोशे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या तक्रारीची दखल घेत करण्यात आलेल्या कारवाई पोलिसांनी  पाच दुकानदारांना अटक केली आहे. तसेच दुकानातून ३ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमजी रोडवरील पाच दुकानांमध्ये पोलिसांनी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT