Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: सातपूर गोळीबार प्रकरण; मुख्य सूत्रधारासह ६ जण पोलिसांच्या ताब्यात

सातपूर गोळीबार प्रकरण; मुख्य सूत्रधारासह ६ जण पोलिसांच्या ताब्यात

Rajesh Sonwane

तबरेज शेख

नाशिक : पूर्ववैमनस्यातून सातपूर येथे एकावर गोळीबार करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे पोलीस (Police) तपासात समोर आले आहे. पोलिसांनी घटनेतील मुख्‍य सुत्रधारासह सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. (Live Marathi News)

काही दिवसांपूर्वी याप्रकरणातील फिर्यादी (Nashik News) राहुल पवार आणि त्याचा मित्र तपन जाधव यांच्यावर सातपूरच्या कार्बन नाका, म्हसोबा मंदिराजवळ पिक्चर स्टाईल काही जणांनी पाठलाग करून पवार आणि जाधव यांच्या वाहनाला धडक देऊन त्यांच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वरीष्ठ पोलिस अधिकारी यांनी गुन्हे शाखा 1, 2 आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना दिल्या होत्या.

गुन्हे शाखा 1 च्या कर्मचाऱ्यांनी सातपूर शिवाजीनगर येथे राहणारे भूषण किसन पवार आणि रोहित मंगलदास अहिरराव या संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनतर मुख्य संशयित आरोपीचा भाऊ गणेश राजेंद्र जाधव याला द्वारका येथून ताब्यात घेतले. तर घटनेतील मुख्य संशयित आशिष राजेंद्र जाधव आणि त्याचा साथीदार किरण दत्तात्रेय चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धुळे येथून तर सातपूर पोलिसांनी सोमनाथ झांजर अश्या मुख्य संशयितासह एकूण ६ जणांना ताब्यात घेतले आहे. फिर्यादी आणि मुख्य संशयित आशिष जाधव यांनी एकमेकांच्या भावांचा २०१४ मध्‍ये खून केला होता. या पूर्ववैमनस्यातून वाद वाढत गेल्याने हा हल्ला झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT