Saptshrungi Devi Yatra Nashik:
Saptshrungi Devi Yatra Nashik:  Saamtv
महाराष्ट्र

Chaitrotsav 2024: भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'चैत्रोत्सवात' सत्पश्रृंगी देवीचं मंदिर २४ तास राहणार खुलं

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. १३ एप्रिल २०२४

उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आद्यस्वयंभू शक्तीपीठ सप्तश्रृंगी मातेच्या चैत्रोत्सवास १६ एप्रिलपासून सुरूवात आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने सप्तश्रृंगी गडावरील सप्तश्रृंगी देवीचे मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चैत्रोत्सव काळात भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवास १६ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. १६ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. चैत्रोत्सव काळात हजारो भाविक सप्तश्रृंगी गडावर गर्दी करत असतात. गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चैत्रोत्सव काळात मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

चैत्रोत्सव काळात अनेक भाविक दूरवरुन देवीच्या दर्शनासाठी येत असतात. अनेकदा प्रवासामुळे भाविकांना उशिर होतो त्यामुळे दर्शन घेता येत नाही. अशा भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे भाविकांना २४ तासात कधीही देवीचे दर्शन घेता येणार आहे.

चैत्रोत्सवाची जय्यत तयारी!

त्याचबरोबर चैत्रोत्सवाला येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. उत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंगी गडावरील खासगी वाहतूक देखील बंद राहणार आहे. तसेच महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे. वाढत्या उन्हाच्या झळा टाळण्यासाठी पहिल्या पायरीसमोर मंडप उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर भाविकांसाठी ७ ठिकाणी आरोग्य पथके राहणार तैनात ठेवण्यात येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024: नॉकऑउट सामन्यात आरसीबी २००पार; CSK समोर २१९ धावांचं आव्हान

TVS ची ही बाईक देते 65 Kmpl मायलेज, फक्त लूक नाही फीचर्सही हाय क्लास; जाणून घ्या किंमत

Special Report : फिक्स झालं, जरांगे पाटील आता थेट विधानसभा निवडणुकीच्या मैदानात!

Special Report : भाजप झाला मोठा, संघ झाला मोठा? नड्डांच्या वक्तव्याने भाजपवर सारवासारवची वेळ?

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

SCROLL FOR NEXT