Liquor Ban Saam tv
महाराष्ट्र

Liquor Ban : दारू विक्रीचा व्हिडीओ काढा, बक्षीस मिळवा; ग्रामसभेत करण्यात आला ठराव

Nashik News : नाशिकच्या येवला तालूक्यातील विखरणी येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारु विक्री होत आहे. यामुळे गावातील अनेकांचे संसार उघड्यावर पडत आहे. तर तरुणांना देखील दारूचे व्यसन

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
मनमाड (नाशिक)
: गावात होणारी दारू विक्री हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. दारूच्या नशेच्या आहारी जाऊन होणार त्रास पाहता  दारुबंदीसाठी गावच्या महिला सरपंच आक्रमक झाल्या. त्यांनी महिलांची ग्रामसभा बोलावली. या ग्रामसभेत महिला देखील आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. तर दारू विक्री होत असतानाचा व्हिडीओ काढा व बक्षीस मिळवा असा ठरावच ग्रामसभेत करून घेतला आहे. 

नाशिकच्या येवला तालूक्यातील विखरणी येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या दारु विक्री होत आहे. यामुळे गावातील अनेकांचे संसार उघड्यावर पडत आहे. तर तरुणांना देखील दारूचे व्यसन लागल्याचे पाहण्यास मिळाले आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडे गावात दारूबंदी करण्यासाठी मागणी करून देखील याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे गावातील महिला देखील आक्रमक झाल्या आहेत. 

सरपंचानी महिलांची बोलाविली ग्रामसभा 

दरम्यान गावात दारूबंदी होत नसल्याने काही महिलांनी गावच्या सरपंचांकडे आपले गाऱ्हाणे मांडले होते. या दारू बंदीबाबत संतप्त झालेल्या विखरणीच्या महिला सरपंच ज्योती शेलार यांनी आज गावातील महिलांची ग्रामसभा आयोजीत केली होती. या ग्रामसभेला येवला तालूका पोलिस अधिकारी उपस्थित झाले होते. या सभेत एकमताने ठराव पारित करण्यात आले. 

त्या व्यक्तींच्या सर्व सुविधा होणार बंद 

गावात झालेल्या ग्रामसभेत काही ठराव पास करण्यात आले. यात दारु विक्री होत असतांना व्हिडीओ काढा आणि बक्षिस मिळवा, असा अनोखा ठराव पास करण्यात आला आहे. तर अवैध दारु विक्री करणाऱ्या व्यक्तींच्या सर्व सुविधा बंद करण्यात येणार असल्याचा ठराव देखील यावेळी करण्यात आला. अवैध दारु विक्री विरोधात झालेल्या या ग्रामसभेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT