Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : धुळ्याहून नवी मुंबईला निघाली कार, मध्यरात्रीची वेळ; पोलिसांनी झडती घेतली अन् बिंग फुटलं

Nashik News : रात्री दोन वाजेच्या सुमारास आडगाव पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना आडगाव ट्रक टर्मिनलजवळ गाडी उभी होती पोलिसांना बघून गाडी घेऊन पळ काढला पोलिसांना संशय आल्याने गाडीचा पाठलाग करण्यास सुरवात केली

Rajesh Sonwane

तबरेज शेख  

नाशिक : कारमध्ये गांजाची तस्करी करण्यात येत होती. गस्तीवर असलेल्या पोलिसांना पाहून गाडी घेऊन फरार होण्याच्या मार्गावर असलेल्या गाडीचा पोलिसांनी पाठलाग सुरु केला. दरम्यान गांजा तस्करी करणाऱ्या गाडीचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून एकास ताब्यात घेतले आहे. मात्र यातील चौघेजण पळून गेले आहेत. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यात २८ किलो गांजा मिळून आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.  

धुळे येथून नवी मुंबईला घेऊन जात असतांना नाशिकच्या आडगाव पोलिसांनी गांजा घेऊन जाणाऱ्या गाडीला पकडले आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार नाशिकमध्ये स्टॉप अँड सर्चची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत आडगाव सियार मोबाईलचे कर्मचाऱ्यांना मोठे यश आलं आहे. सदरची कारवाई मध्यरात्रीनंतर करण्यात आली आहे. 

रात्री दोन वाजेच्या सुमारास आडगाव पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना आडगाव ट्रक टर्मिनल जवळ चारचाकी गाडी उभी होती. मात्र पोलिसांना बघून हि गाडी घेऊन तिथून पळ काढला. यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग करण्यास सुरवात केली. पोलीस पाठलाग करीत असल्याच्या लक्षात येताच गांजा तस्करांनी आपली चार चाकी वाहन स्पीड अजून वाढवीला. त्यानंतर आडगाव पोलिसांनी पोलीस कंट्रोल रूमला कॉल करून रात्री गस्तीवर असलेल्या इतर वाहनांना गाडी बाबत सूचना दिली आहे.  

पोलिसांच्या वाहनाला धडक देत फरार होण्याचा प्रयत्न 

नाशिक शहरातील भद्रकाली आडगाव पंचवटी मुंबई नाका पोलिसांच्या गाड्या लाल रंगाचे चार चाकी गाडीचा पाठलाग करत होते. या दरम्यान गांजा तस्करांनी पोलिसांचे वाहनांना देखील धडक देऊन पळ काढला होता. एक तासाच्या पाठलाग नंतर शेवटी संभाजीनगर रोडवर रस्त्याचा काम चालू असल्याने त्या ठिकाणी गांजा तस्करांनी आपली गाडी सोडून पळ काढला. गाडीमध्ये असलेल्या पाच पैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सूत्रधार हे पळून गेले असून त्यांचे शोधासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Rate Today : LPG सिलिंडर झाला स्वस्त! नवे दर जाहीर; तुमच्या शहरातले दर काय?

Maharashtra News Live: विदर्भात झालेल्या तुफान पावसामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

SCROLL FOR NEXT