Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : गावठी पिस्तूल बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात; नाशिक पोलिसांची कारवाई

Nashik News : राज्यासह देशांमध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्याच अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; यासाठी शहरात पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे.

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. या दम्यान (Nashik) नाशिकच्या नाशिक रोड परिसरात दहशत माजवण्यासाठी गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला नाशिक पोलिसांच्या (Nashik Police) गुन्हे शाखा २ च्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक जिवंत काडतुसही मिळून आले आहे. (Tajya Batmya)

राज्यासह देशांमध्ये लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वारे वाहू लागले आहेत. त्याच अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये; यासाठी शहरात (Police) पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, वाहतूक मार्गाच्या इथे पोलिसांनी चेकिंग सुरू केलेली आहे. महामार्गावर देखील वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. याच दरम्यान शस्त्र बाळगून असलेल्या इसमाबद्दल पोलिसांना माहिती मिळाली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या पियुष दोंदे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल २५ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या वडिलांचं निधन; सांगोला परिसरात शोककळा

Government Scheme: खुशखबर! महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला ₹३००० येणार; नवीन योजनेची घोषणा

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश भाऊंची बॉक्स ऑफिसवर हवा, दुसऱ्या सोमवारी 'राजा शिवाजी'नं किती कमावले?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ₹३००० एकत्र मिळणार; लाभार्थी महिलांचा आकडा आला समोर, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT