Nashik News Saam Tv News
महाराष्ट्र

कानठळ्या बसणारा आवाज, घरांच्या काचा फुटल्या; नागरिकांची घराबाहेर धाव, नाशिकमध्ये 'त्या' आवाजाचं गुढ उलगडलं

Sukhoi Fighter Jet Sonic Boom: दिंडोरीत प्रचंड आवाजाचा हादरा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. २५ किमी परिसरात आवाज, काही घरांच्या काचा फुटल्या. हा आवाज सुखोई लढाऊ विमानाच्या सरावातील सॉनिक बूममुळे झाला.

Bhagyashree Kamble

  • दिंडोरीत प्रचंड आवाजाचा हादरा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.

  • २५ किमी परिसरात आवाज, काही घरांच्या काचा फुटल्या.

  • हा आवाज सुखोई लढाऊ विमानाच्या सरावातील सॉनिक बूममुळे झाला.

  • पोलिसांनी स्पष्ट केलं, कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही.

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात गुरुवारी अचानक जोरदार आवाजाचा हादरा बसला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काहीकाळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. हा आवाज २५ किलोमीटरपर्यंत ऐकू गेला आणि इतका प्रचंड होता की काही घरांच्या काचा फुटल्या. सुरुवातीला लोकांनी हा भूकंप किंवा विमान दुर्घटनेचा आवाज असावा असा अंदाज व्यक्त केला. मात्र, पोलीस तपासात वेगळीच माहिती समोर आली.

दिंडोरीत हादऱ्यामुळे भूकंप किंवा विमान अपघात घडला असावा, असा अंदाज काहींनी व्यक्त केला. या भीषण आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. भयभीत नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाला सुरूवात केली. गुढ आवाजाबाबात तपास करताना पोलिसांनी मोठी माहिती दिली.

हा आवाज ओझर येथे असलेल्या हिंदूस्थान अरोनॉटिक्स लिमिटेडच्या लढाऊ विमानांच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सुखोई लढाऊ विमानांच्या सरावाचा होता. सराव सुरू असताना विमान अगदी जमिनीच्या जवळून गेले. यामुळे विमानाचा मोठा आवाज झाला. कानठळ्या बसणारा आवाज इतका प्रचंड होता की, अनेक घरांच्या काचा फुटल्या.

या आवाजाबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले, 'घडलेल्या घटनेबाबत एचएएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. सुखोई विमानाचा सॉनिक बूम झाल्यानं मोठा आवाज येतो. या आवाजाची तीव्रता जास्त असते. हाच प्रकार दिंडोरीत घडला. विमान जवळून गेल्यानं मोठा आवाज झाला. कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. या प्रकाराबाबत अधिक तपास सुरूये', अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT