Girna Dam Saam tv
महाराष्ट्र

Girna Dam : गिरणा धरणात केवळ १५ टक्के पाणी साठा; पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न गंभीर

Nashik News : गिरणा नदीचे उगमस्थान तसेच नाशिकजवळ असलेल्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पुरेसा पाऊस अद्याप झालेला नाही.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत पुरेसा पाऊस न झाल्याने धरणाने तळ गाठला आहे. यामुळे सध्या गिरणा धरणात केवळ १५.२२ टक्के एवढा पाणी साठा शिल्लक राहिला आहे. आगामी दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर गिरणा धरण परिसरात पाण्याची समस्या जाणविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गिरणा नदीचे उगमस्थान तसेच नाशिकजवळ असलेल्या (Girna Dam) गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पुरेसा पाऊस अद्याप झालेला नाही. नाशिक जिल्ह्यात देखील पावसाळा सुरु झाल्यानंतर म्हणजे जून महिन्यात सुरवातीला पाऊस झाला होता. यानंतर मागील दीड महिन्यात अपेक्षित असा पाऊस झालेला नाही. यामुळे धरणात देखील पाण्याची आवक झालेली नाही. शिवाय गिरणा धरण मोठे असल्याने याची पाण्याची क्षमता देखील अधिक असल्याने धरणातुन पाणी लवकर सुटत नसल्याने पुढे (Girna River) नदीला देखील पूर येत नाही. यंदा तर पाण्याची आवकच नसल्याने धरण व नदी काठच्या गावांना पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत यंदा निम्मेच साठा 

मागील वर्षी जुलैअखेर धरणात ३१.८८ टक्के जलसाठा होता. मात्र यंदा तो निम्म्या पेक्षा कमी असल्याने (Nashik) नाशिकच्या मालेगावसह खानदेश मधिल नागरीकांची चिंता वाढली आहे. या धरणावर अनेक पाणी योजना अवलंबून असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. पुढील काही दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर पाण्याची समस्या गंभीर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT