Nashik Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Nashik Fraud Case : कांदा खरेदी करत व्यापाऱ्याची साडेसात लाख रुपयात फसवणूक; मनमाड बाजार समितीतील प्रकार

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील मनमाड बाजार समितीत कांद्याचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून विदर्भ व सोलापूर जिल्ह्यातील कांदा खरेदी केला. खरेदी वेळी व्यापाऱ्याने विकलेल्या मालाचे पैसे मागितले

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या मनमाडमधील एका कांदा व्यापाऱ्याची पाच जणांनी कांदा खरेदी करत तब्बल साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मनमाड बाजार समितीमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेचचांदवडमध्ये एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.  

नाशिक जिल्ह्यातील मनमाड बाजार समितीत कांद्याचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून विदर्भ व सोलापूर जिल्ह्यातील कांदा खरेदी केला. खरेदी वेळी व्यापाऱ्याने विकलेल्या मालाचे पैसे मागितले. मात्र रक्कम न देता नंतर देतो असे सांगत या कांदा खरेदी करणारे पाच जण गेले. मात्र बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील रक्कम मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. 

मनमाड पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान कांदा खरेदी करणाऱ्या पाच जणांनी कांदा व्यापारी गणेश प्रभाकर अहिरे याची साडेसात लाख रुपयां पेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर अहिरे यांनी मनमाड पोलिसात फसवणूकीची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात संगनमताने फसवणूक प्रकरणी विविध कलमाद्रवारे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.

द्राक्ष उत्पादकांची दोन लाखाची फसवणूक

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पाच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या द्राक्षांची काही व्यापाऱ्यांनी बागेची खरेदी केली. प्रत्येक शेतकऱ्याचे ठराविक रकमेनुसार द्राक्षांची खरेदी केली. एकुण दोन लाख रुपयांची खरेदी व्यापाऱ्यांनी केली. मात्र अनेक दिवस उलटून ही वारंवार संपर्क करुन देखील खरेदीदारांनी त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच द्राक्ष उत्पादकांनी वडनेर- भैरव पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी दोघां विरोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT