Nashik Corporation Saam tv
महाराष्ट्र

Nashik Corporation: नाशिक मनपा कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार; प्रशासनाला दिली १४ दिवसांची नोटीस

Nashik News : नाशिक मनपा कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार; प्रशासनाला दिली १४ दिवसांची नोटीस

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम, दिवाळी सानुग्रह अनुदान, प्रलंबित पदोन्नत्या यासह १४ मागण्यांसाठी (Nashik) नाशिक महापालिकेच्या कर्मचारी सेनेचे संपाचे हत्यार उपसले आहे. महापालिका कर्मचारी सेनेकडून प्रशासनाला संपाची नोटीस दिली असून ऐन सणासुदीच्या काळात पालिकेचे तब्बल साडेतीन हजार कर्मचारी (Strike) संपावर जाणार असल्याने महापालिकेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Breaking Marathi News)

नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम, दिवाळी सानुग्रह अनुदान, प्रलंबित पदोन्नत्या यासह १४ मागण्यांसाठी कर्मचारी सेनेचे संपाच हत्यार उपसलंय. १४ दिवसांत पालिका प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास कुठल्याही क्षणी संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ऐन सणासुदीच्या काळात नाशिक महापालिकेचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी सेनेच्या कर्मचाऱ्यांनी १८ ऑक्टोबरनंतर कुठल्याही क्षणी संपावर जाण्याचा इशारा दिला. संपाची नोटीस देण्यात आली असून मागण्या मान्य करण्यासाठी प्रशासनाला १४ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून यानंतर संपावर ठाम असल्याचे महापालिका कर्मचारी सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी बोलताना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT