Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik : नाशिकमध्ये ३१४ ग्रॅम एमडी ड्रग्ज, ३७ किलो गांजा जप्त; नाशिक पोलिसांची कारवाई

Nashik News : मागील काही वर्षांमध्ये नाशिक शहर अचानकपणे एमडी ड्रग्जच्या खरेदी- विक्रीद्वारे प्रकाशझोतात आले होते. यामुळे पोलिस आयुक्तालयाने गेल्या दीड ते दोन वर्षापासून ठोस पावले उलचली आहेत

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मुळात अमली पदार्थ विक्री व वाहतुकीस बंदी असताना मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. यात गेल्या सहा महिन्यात नाशकात अमली विरोधी पथकाने तब्बल ८४ कारवायांमध्ये ८१ जणांना अटक केली आहे. तर त्यांच्याकडून ३१४.५ ग्रॅम एमडी ड्रग्स पावडरसह ३६ किलो गांजा जप्त केला आहे.

मागील काही वर्षांमध्ये नाशिक शहर अचानकपणे एमडी ड्रग्जच्या खरेदी- विक्रीद्वारे प्रकाशझोतात आले होते. यामुळे पोलिस आयुक्तालयाने गेल्या दीड ते दोन वर्षापासून ठोस पावले उलचली आहेत. ड्रग्ज मुक्त नाशिकचा टास्क शहर पोलिस आयुक्तालयाकडून हाती घेण्यात आला आहे. कुठल्याही अमली पदार्थाची खरेदी- विक्री कोणत्याही माध्यमातून होऊ नये, यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकासह गुन्हे शाखाची सर्व पथकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

ड्रग्स विक्रीत महिलांचाही समावेश 

नाशिक पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत कारवाई केली आहे. सहा महिन्यात करण्यात आलेल्या कारवायांमध्ये ८१ जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष बाब म्हणजे ड्रग विकणाऱ्यांमध्ये सहा महिलांना अटक करण्यात आली आहे. या महिला बारावी शिकलेल्या असून बावीस ते पंचवीस वर्षाच्या वयोगटातल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पान टपरीचीही तपासणी 

दरम्यान नाशिक शहर व परिसर ड्रग्जमुक्त व्हावा; यासाठी सातत्याने कारवाया देखील केल्या जात आहे. अधूनमधून विविध पान स्टॉल, कॅफेची तपासणी करण्यात येते. यामध्ये अमली पदार्थाचा अवैध व्यवसाय आढळून आल्यास कारवाई केली जात आहे. तर पोलिसांचाही छुपा सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT