Nashik News Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: आधी मृत्यू अन् नंतर थेट जिवंतही झाला... नाशिक जिल्हा रुग्णालयातील प्रकाराने खळबळ

Nashik District Hospital: या गंभीर प्रकरणाची रुग्णालयातील वरिष्ठ स्तरावरुन माहिती घेतली जात आहे.

Gangappa Pujari

तबरेज शेख, प्रतिनिधी....

Nashik News: स्वत:ला जाळून घेतलेल्या व्यक्तीला जिवंतपणीच मृत घाेषित केल्याचा संतापजनक प्रकार गुरुवारी सकाळी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घडला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले. या गंभीर प्रकरणाची रुग्णालयातील वरिष्ठ स्तरावरुन माहिती घेतली जात आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नितीन सुरेश मोरे यांनी २२ तारखेला दुपारी स्वत:च्या दुकानात पेट्रोलने पेटवून घेतले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते ९३ टक्के भाजलेले असून, गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मोरे यांची कोणतीही हालचाल दिसली नाही.

प्रशिक्षणार्थी डॉ. नलवाडे यांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर इसीजी घेतला. इसीजीचा रिपोर्ट फ्लॅट (सरळ रेष) आल्याने त्यांनी मोरे मयत झाल्याचे सांगितले. त्यावेळी मोरे यांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. नातेवाईकांनीही रुग्णालयीन व पाेलिस प्रक्रियेनुसार सिव्हिल पोलीस चौकीत रुग्ण मयत झाल्याची माहिती दिली. (Nashik)

मात्र सकाळी आठ वाजेच्या सुमारास वॉर्डमध्ये उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यास मयत मोरे यांच्या पायांची मंद हालचाल होत असल्याचे दिसले. त्यांनी इसीजी रिपोर्ट घेतला असता रुग्णाच्या हृदयाचे ठोके सुरु हाेते. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय उपचार सुरू केले. मयत मोरे जिवंत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आल्यानंतर मात्र त्यांचा संताप अनावर झाला.

नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वॉर्डातील नर्स, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे पोलीसांना पाचारण करण्यात आले. आठ वाजता जिंवत झालेले मोरे यांचे हृदय पुन्हा साडेनऊ वाजेच्या सुमारास बंद पडले. वैदयकीय अधिकाऱ्यांनी त्यांची नाडी तपासली. त्यानंतर त्यांचे हृदय सुरू करण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आल्यानंतर पुन्हा त्यांचे हृदय सुरू झाले. या धक्कादायक प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Gold Price Today: खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण! 18K, 22K आणि 24K सोन्याचे आजचे दर वाचा

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंढेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT