Nashik Pregnant Woman Death News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Pregnant Woman Death: गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; समोर आली धक्कादायक माहिती

Nashik Pregnant Woman Death News: इगतपुरी तालुक्यातील जुनवणे गावातील गर्भवती महिलेला उपचारासाठी घेऊन जाताना तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

साम टिव्ही ब्युरो

Nashik Pregnant Woman Death News: गेल्या आठवडाभरापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. अशातच इगतपुरी तालुक्यातील जुनवणे गावातील गर्भवती महिलेला उपचारासाठी झोळीत घेऊन जाताना तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

खराब रस्त्यामुळे गर्भवती महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे तिचा आणि पोटातील बाळाचा दुर्दैवी अंत झाला, असा आरोप करण्यात येत होता. या महिलेचा मृतदेह गावी झोळीतूनच परत न्यावा लागल्याने या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले.

दरम्यान, या प्रकरणाबाबत आरोग्य विभागाने अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. संबधित महिलेने स्थानिक वैदूकडे काही औषधोपचार घेतले. तिचा मृत्यू हा प्रसूती वेदनांमुळे झाला नसल्याचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.

संबंधित महिलेचा मृत्यू हा प्रसव वेदनांमुळे झालेला नाही. वैदूकडून घेतलेल्या औषधोपचारानंतर तिला उलट्या आणि प्रसूतीपूर्व झटके आल्याचे या अहवालात नमूद केले आहे. महिलेचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. महिलेच्या प्रसूतीची तारीख सप्टेंबर महिन्यातील होती. आरोग्य केंद्रावर केलेल्या तिच्या सर्व चाचण्यांचे अहवाल साधारण होते, अशी माहितीही जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली आहे.

घटना नेमकी काय?

तळोघ ग्रामपंचायत हद्दीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती असून मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांना जवळपास अडीच किलो मीटर कच्च्या रस्त्याने प्रवास करावा लागतो. हा कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झालेला आहे.

जुनवणेवाडी येथील वनिता भावडू भगत ( वय २३ ) या गरोदर आदिवासी महिलेला प्रसूतीवेदना सुरु झाल्याने पहाटे अडीच वाजता दवाखान्यात जाण्यासाठी नातेवाईक आणि तिने पायपीट केली. जास्तच त्रास होऊ लागल्याने तिला डोली करून त्यामध्ये झोपवण्यात आले. अखेर दवाखान्यात पोहोचल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली होती.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

SCROLL FOR NEXT