Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

Nashik News : दिवाळी उत्सव नुकताच पार पडला आहे. सणानिमित्ताने कुटुंब गावाकडे किंवा पर्यटनासाठी बाहेर जात असतात. यामुळे काही दिवस घर बंद असते

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिकच्या सातपूर परिसरात असलेल्या साळुंखेनगरमध्ये दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाख रुपयांवर चोरट्याने डल्ला मारला आहे. विशेष बाब म्हणजे या चोरट्याने घराच्या खिडकीचे गज तोडून या घरात प्रवेश करत चोरट्यांनी चोरी केली.

दिवाळी उत्सव नुकताच पार पडला आहे. सणानिमित्ताने कुटुंब गावाकडे किंवा पर्यटनासाठी बाहेर जात असतात. यामुळे काही दिवस घर बंद असते. अशा बंद घरांची रेकी करत चोरटे संधी साधत असतात. असाच प्रकार (Nashik News) नाशिकच्या सातपूर परिसरात समोर आला आहे. जय किशोर पंडित असं चोरी झालेल्या बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे. जय पंडित हे दिवाळीनिमित्त बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेत काल रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केली.

दरम्यान जय पंडित यांना आपल्या मोबाईलवरती दिसणाऱ्या (CCTV) सीसीटीव्ही कॅमेरा बंद आढळल्याने त्यांनी त्यांचे मेहुणे यांना त्यांच्या घराची तपासणी करत असताना त्यांच्या असे निदर्शनास आले की चोरट्यांनी खिडकी तोडून आज प्रवेश केला आहे. चोरीमध्ये सोन्याचे दागिने आणि रोकड चोरट्याने लंपास केली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT