Engineering Girl Student End Life In Nashik Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने वसतिगृहातच संपवलं जीवन; धक्कादायक घटनेनं नाशिकमध्ये खळबळ

Engineering Girl Student End Life In Nashik: नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्येच आपले जीवन संपवले.

Priya More

अभिजीत सोनावणे, नाशिक

नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केलीची घटना घडली आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्येच आत्महत्या केली. अस्मिता संजय पाटील (18 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. अस्मिताने महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अस्मिताचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. अस्मिता इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. तिने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT